शोधा
नोंदणी करा
सद्गुरू
Login

ऑनलाईन
कार्यक्रम

Yoga & Meditationरोगप्रतिकारशक्ती वाढवापाककृती

जर प्रत्येक परिस्थितीतून तुम्ही आंतरिक समतोल राखून जाऊ शकलात तर तुम्हाला तोंड द्यावी लागणारी प्रत्येक परिस्थिती तुमचं जीवन समृद्ध करू शकेल.
- सद्गुरू

आंतरिक समतोल राखा
ह्या जागतिक कोव्हीड महामारीच्या काळात

आपण एका असामान्य आणि चिंताजनक काळात जगत आहोत. कोरोना व्हायरस (कोविड -१९) ची ही जागतिक महामारी आजही अमेरिकेत आकार घेत असल्यामुळे आपण सर्वच जण आपल्या दैनंदिन जीवनात नाट्यमय बदल अनुभवत आहोत. तीव्र संकटाच्या या वेळी, चिंता आणि तणाव तुमच्यावर सहजच वरचढ होऊ शकतात. आपली स्वतःची शांतता, आंतरिक संतुलन आणि आरोग्य राखणे हे आता महत्वाचे आहे.

ईशा फाउंडेशन अनेक शक्तिशाली योग आणि ध्यान साधने प्रदान करते जे ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत. याने तुमच्या सर्वांगीण कल्याणाबरोबरच स्वास्थ्य आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते .

मोफत मार्गदर्शित ध्यान

ईशा क्रिया

ईशा क्रिया ही सद्गुरुंनी निर्माण केलेली एक सोपी पण अतिशय प्रभावी ध्यानाची क्रिया आहे. "ईशा" म्हणजे सृष्टीचा स्त्रोत “क्रिया” म्हणजे त्या दिशेने असलेली अंतर्गत क्रिया.

हार्वर्ड मेडिकल स्कूलने केलेल्या संशोधनानुसार, हे ध्यान तणाव, क्रोध, थकवा, गोंधळ आणि उदासीनता कमी करते असे सिद्ध झाले आहे.

संशोधनाचे निष्कर्ष

अवधी: 12-18 मिनिटे
वेबिनारच्या माध्यामातून देखील शिकवली जाते

वेबीनारसाठी नाव नोंदवा
आत्ता ध्यान करा

निर्माण करण्याची शक्ती (संच)

आयुष्यात ज्याची इच्छा असते ते निर्माण करण्यासाठी मनाची शक्ती वापरणे म्हणजे चित्त शक्ती. चार प्रकारचे चित्त शक्ती मार्गदर्शित ध्यान विनामूल्य उपलब्ध आहे आणि तुमच्या जीवनात प्रेम, आरोग्य, शांती आणि यश आणण्यासाठी ते मदत करेल.

अवधी: २५-३० मिनिटे

इन्फिनिटी मेडिटेशन (अनंताचे ध्यान)

अनंताचे ध्यान सद्गुरूंनी उपलब्ध करून दिले आहे ज्यामुळे तुमच्या ऊर्जेमध्ये स्थिरता आणि संतुलन येते. तुम्हाला अनंताचा अनुभव करण्याची शक्यता प्राप्त होते.

अवधी: ३० मिनिटे (सूचनांसहित)
२० मिनिटे (ध्यान)

विनामूल्य योग सराव

योगाच्या तत्काळ शारीरिक आणि मानसिक फायद्यांचा आनंद घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे ईशा योगाची साधने, अ‍ॅपवर विनामूल्य डाउनलोड करणे. सद्गुरुंनी तयार केलेल्या आणि योगशास्त्रावर आधारित, 5 मिनिटांचे हे सराव, दररोज केल्यानंतर, तुमच्या जीवनात परिवर्तन घडवू शकतात!

Inner Engineering Online

"ज्याप्रमाणे बाह्य सुख-समृद्धीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, त्याचप्रमाणे आंतरिक कल्याणासाठीसुद्धाएक विस्तृत विज्ञान आहे."
- सद्गुरू

इनर इंजिनियरिंग हे योग विज्ञानातून निर्माण केलेले एक तंत्रज्ञान आहे. स्वत: च्या परिवर्तनाची शक्तिशाली प्रक्रिया, शास्त्रीय योगाचे सार, जीवनातील महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी ध्यान आणि प्राचीन ज्ञानाची गुपिते यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या सर्वोच्च क्षमतेचा शोध घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

तुमच्या स्वत: च्या वेळेत आणि जागेत सद्गुरूबरोबर इनर इंजिनीरिंग ऑनलाईन (आयईओ) चा अनुभव घ्या. इनर इंजिनियरिंग ऑनलाईनमध्ये ९० मिनिटांची ७ सत्रे आहेत जी योगाच्या प्राचीन विज्ञानातील शक्तिशाली साधने देतात. या कार्यक्रमात तुम्ही ज्या पद्धतीने जगता, तुमचे जीवन आचरण करता आणि अनुभवता या मध्ये बदल करण्याचे सामर्थ्य आहे.

तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्याचा एक परिपूर्ण मार्ग

योग विज्ञान तुमच्या रोग प्रतिकारशक्तीला चालना देण्यासाठी आणि तिचा विकास करण्यासाठी आणि तुमच्या एकूण आरोग्याची मदत करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय देते.

कडुलिंब

कडुलिंब एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे जी कडुलिंबाच्या झाडापासून येते. पचन, श्वसन, रक्ताभिसरण प्रणाली, मूत्रमार्ग आणि पुनरुत्पादक प्रणालीसाठी त्याचा वापर फायदेशीर आहे. व्यापक स्तरावर, कडुलिंब शरीराच्या नैसर्गिक स्वच्छतेस आणि निरोगी ऊतींच्या पुनरुज्जीवनास मदत करते. निरनिराळ्या वैद्यकीय नोंदींमध्ये असे दिसून आले आहे की कडुलिंबाचे नियमित सेवन केल्यास खालील फायदे मिळतात:

  • निरोगी पचन संस्था राखण्यास मदत करते
  • रोगप्रतिकारक शक्ती आणि यकृत कार्य मजबूत करते
  • चांगली चयापचय क्रिया टिकवून ठेवण्यास मदत करते
  • निरोगी श्वसन प्रणाली राखण्यासाठी मदत करते
  • बॅक्टेरियाविरोधी, अँटी-व्हायरल, अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल
  • रक्तातील साखरेची निरोगी पातळी, रक्त शुध्दीकरण आणि विषारी घटक काढून टाकण्याला मदत करते

हळद

हळद हा एक मसाला आहे जो हळदीच्या वनस्पतीपासून बनविला जातो. हे आशियाई खाद्यपदार्थांमध्ये नेहेमी वापरले जाते. तुम्हाला कदाचित हळद हा आमटीत वापरला जाणारा मुख्य मसाला म्हणून माहित असेल. हळद औषधे बनविण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

Benefits:
  • शरीरातले जडत्व कमी करते
  • निरोगी सांध्यांसाठी फायद्याची ठरते
  • रक्त, शरीर आणि ऊर्जा शुद्ध करण्यात मदत करते
  • श्वसन कार्यात मदत करते
  • कर्करोग रोखू शकते

तांबे

तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी आपल्या विविध प्रणालींतून विषारी पदार्थ साफ करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकते.

पाण्याला स्मृती असते, म्हणून ते कशा प्रकारे साठवून ठेवले जाते याची आपण खबरदारी घेतो. पाणी जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात ठेवलं, विशेषकरून रात्रभर किंवा कमीतकमी 4 तास, तर तुम्ही पाहाल ते तांब्याचे गुण आत्मसात करतं जे खास करून तुमच्या यकृतासाठी फार चांगलं आहे आणि सोबत तुमचे सर्वसामान्य आरोग्य आणि उर्जेच्या दृष्टीनेसुद्धा फार गुणकारी आहे."सद्गुरू

तांबे एक प्रतिजैविक (अँटी मायक्रोबियल) आहे. हे कधीकधी काही मिनिटांतच बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करते. संशोधन

वनौषधी जाम

आयुर्वेदिक वनौषधी जाम हे 4000 वर्ष प्राचीन एंटीऑक्सीडेंटनी भरपूर आणि वृद्धावस्था पुढे ढकलण्याचे सूत्र आहे ज्याला पारंपरिकदृष्ट्या दीर्घायुष्याचे अमृत म्हटले जाते. उर्जा आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं,पचन संस्था निरोगी ठेवतं आणि शरीर शुद्ध करून रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलचा स्तर नियंत्रित ठेवतं. हे चवदार मिश्रण हिमालयात आढळणारे सेंद्रिय आमलकी फळ व सोबत सेंद्रिय वनौषधी आणि मसाले यापासून बनवले जाते. आयुर्वेदिक हर्बल जाम तुमच्यात तारुण्य, चैतन्य ऊर्जा भरतं

तुमची रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी पाककृती

सोपे चवदार आहार

पालक खिचडी(पालक, तुरडाळ आणि भाताची खीर)

जेव्हा तुम्हाला हवामानाचा त्रास होत असेल किंवा तुम्ही आजारी असाल तेव्हा हे एक उत्तम खाद्य आहे. केवळ आरामदायकच नाही तर हे जीवनसत्त्वे, लोह आणि मॅग्नेशियमने भरलेले आहे जे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यास मदत करेल

प्रमाण ३-४

सामग्री

  • १ कप छोट्या दाण्यांचा तांदूळ
  • १/२ कप मूग डाळ
  • १.५ टेबल स्पून मीठ
  • ४ कप पाणी
  • १.५ किलो लहान पालक
  • १/२ इंच आलं
  • ३ चमचे तूप आणि वाढण्यासाठी जास्तीचे
  • १ टेबल स्पून जिरे
  • १ टेबल स्पून काळी मिरी

सूचना:

  1. डाळ आणि तांदूळ धुवून घ्या. प्रेशर कुकरमध्ये तांदूळ, डाळ, पाणी आणि मीठ घाला आणि ६ मिनिटे प्रेशर कूक करा. त्यानंतर ५ मिनिटे नैसर्गिकरित्या वाफ जाईपर्यंत थांबा.
  2. मोठ्या भांड्यात ८ ते १० कप पाणी उकळवा. पालकाची पाने टाकून १ ते २ मिनिट उकळा किंवा मऊ पडेपर्यंत ठेवा. पाणी पूर्णपणे काढून टाका.
  3. ब्लेंडरमध्ये आले आणि उकडलेला पालक आणि काळी मिरी घाला आणि पातळ प्युरी बनवा.
  4. एका भांड्यात तूप गरम करा. जिरे घाला आणि त्यांना सुमारे 30 सेकंद तडतडू द्या. पालक प्युरी आणि मीठ घालून हलवा. नंतर शिजवलेला भात आणि डाळ घाला (वरील चरण 1 मध्ये करून घेतलेलं ) आणि सर्वकाही एकत्र करा. चवीनुसार तूप आणि काळी मिरी घालून वाढा.

आलं आणि कोबी बरोबर रताळं

प्रमाण

सामग्री

  • ३/४ इंच ताजं आलं
  • २५० ग्रॅम कोबी.
  • दोन चिमूट मीठ
  • १ टेबल स्पून तूप किंवा नारळाचं तेल
  • २ कप रताळी

सूचना:

  1. कोबीची पाने तुकतुकीत हिरवा रंग येई पर्यंत उकळा.
  2. एका वेगळ्या भांड्यात रताळ्याचे तुकडे फक्त बुडेपर्यंत पाणी घाला. मीठ घालून मऊ होई पर्यंत उकळा. गॅस वरून काढा आणि ते पाणी परत वापरासाठी ठेवा.
  3. किसलेले आले ३० सेकंदासाठी परता. मग उकडलेली रताळी, कोबी आणि चवीपुरते मीठ घाला. रताळी मोडणार नाहीत अशी काळजी घेऊन हळुवारपणे एकत्र करा.

आवळा मसूर सूप

प्रमाण ४-५

सामग्री

  • १/२ कप मसूर डाळ
  • १/२ कप हिरवे मूग
  • २ लवंगा
  • २-३ मिरीचे दाणे
  • १/२ कप चिरलेला पालक
  • १/२ कप चिरलेलं गाजर
  • १ इंच आलं
  • २ चिरलेले टोमॅटो
  • बारीक चिरलेले २ आवळे

सूचना:

  1. एका भांड्यात आवळ्यासह सर्व भाज्या घाला आणि ४-५ कप पाणी घालून ढवळा आणि झाका. एक उकळी आणा आणि मंद आचेवर १५ मिनिटे किंवा भाज्या मऊ होईपर्यंत ठेवा. गॅस वरुन उतरावा आणि थंड झाल्यावर त्याची प्युरी करा.
  2. कुकर मध्ये एक टेबल स्पून तूप घ्या. मसूर आणि मूग घालून व्यवस्थित हलवा. पाणी आणि मीठ टाकून कूकरच्या ३-४ शिट्ट्या करा आणि कुकर थंड होऊ द्या. कुकर उघडून सगळ्याची पातळ प्युरी करा.
  3. माध्यम आचेवर एक पण गरम करा. गरम झाल्यावर मिरी आणि लवंगा त्यावर तडतडू द्या. आता आल्याची पेस्ट त्यात घाला. कच्चा वास गेल्यावर भाज्यांची पेस्ट आणि डाळी त्यात टाका.
  4. पाणी टाकून सुपाएवढं पातळ करा आणि ५ मिनिटांसाठी गॅस वर ठेवा.
  5. वर कोथिंबीर भुरभुरा.

पौष्टिक पेय

विटामीन बुस्टर स्मूदी

प्रमाण

सामग्री

  • १ संत्र सोलून तुकडे केलेलं
  • १ मोठं गाजर सोलून तुकडे केलेलं
  • मोठे तुकडे केलेल्या सेलरीच्या २ काड्या
  • ५० ग्रॅम आंबा मोठे तुकडे केलेला
  • २०० मिली पाणी

सूचना:

  1. सर्व सामग्री (संत्र, गाजर, आंबा) ब्लेंडर मध्ये घालून, त्यावरून पाणी टाकून, पातळ होईपर्यंत ब्लेंडर मधून फिरवा.

गाजर-आलं स्मूदी

प्रमाण free-ym:recipes:carrotGingerSmoothie:servings

सामग्री

  • १ मोठं पिकलेलं केळ
  • १ कप ताजे अननस
  • १/२ कप ताजं आलं
  • १/४ चमचा हळद (किंवा दालचिनी)
  • १/२ कप गाजराचा रस
  • १ टेबल स्पून लिंबाचा रस
  • १ कप बिनसाखरेचे नारळाचे दुध

सूचना:

  1. एका ब्लेंडर मध्ये ही सर्व सामग्री घेऊन घट्ट स्मूदी होईपर्यंत फिरवा. जर बारीक होत नसेल तर गाजराचा रस किंवा नारळाचं दूध घाला. गरज पडल्यास ब्लेंडरच्या भांड्याच्या बाजूला लागलेली स्मूदी परत खाली ढकलून फिरवा.
  2. चव घेऊन अजून गोडी साठी केळ किंवा अननस घाला, आंबटपणासाठी लिंबू, चवीसाठी आलं, उष्णतेसाठी हळद घाला.

हिरवी स्मूदी

प्रमाण

सामग्री

  • सोलून तुकडे केलेलं १ केळं
  • सोललेलं १ इंच आलं
  • २ ओंजळभर ताजा पालक
  • १ कप ताजे अननसाचे तुकडे
  • १/२ कप नारळाचं पाणी
  • १/२ कप बदाम दूध (किंवा प्लेन ग्रीक योगर्ट)
  • १ टेबल स्पून चिया सीड्स

सूचना:

  1. सर्व सामग्री एका ब्लेंडर मध्ये घ्या. स्मूदी होईपर्यंत ब्लेंडर मधून फिरवा.

गरमागरम उत्साहवर्धक चहा

आलं-हळद चहा

प्रमाण

सामग्री

  • ५ कप पाणी
  • १ लिंबाचे पिवळे साल - साल काढणीचा सोलणीचा वापर करा
  • २ इंच आल्याचे पातळ काप, सालासकट
  • २ इंच अख्ख्या हळदीचे काप सालासकट
  • १ काळीमिरी चुरून
  • १ लिंबाचा रस
  • १ टेबल स्पून नारळाचे तेल, लोणी किंवा अवोकाडो तेल
  • १ टेबल स्पून कच्चा मध

सूचना:

  1. पाणी, लिंबाचे साल, आले, हळद आणि मिरपूड याला उकळी आणा, मग मंद आचेवर ७ मिनिटं शिजवा.
  2. आचेवरून काढा, नारळाच्या तेलात लिंबाचा रस एकत्र करा आणि त्यात घाला. चहा गाळा आणि १ चमचा मध घाला जर कच्चा मध वापरत असाल तर चहा थंड होऊ द्या जेणेकरून उष्णतेने मधातील जीवनसत्वे नष्ट होणार नाहीत. आणि मजा घ्या!

लिंबू आणि आल्याचा चहा

प्रमाण

सामग्री

  • १ इंच ताजे आले (सोलायची आवश्यकता नाही)
  • १ कप पाणी
  • १ चमचा ताजा लिंबाचा रस
  • 1 चमचा मध

सूचना:

  1. पाणी उकळून बाजूला ठेवा
  2. लिंबाचे छोटे छोटे काप करा. किसणी वापरून हाताने आले किसा गरम पाण्यात घाला
  3. ५-१० मिनिटे ठेवा
  4. चहा कपात गाळून घ्या.
  5. मध टाकून ढवळा. पिण्यासाठी तय्यार!

एल्डरबेरी चहा

प्रमाण

सामग्री

  • २ कप पाणी
  • २ कप सुकवलेल्या एल्डरबेरी
  • २ चमचे कच्चा मध (हवा असल्यास)

सूचना:

  1. पाणी आणि एल्डरबेरी एका खोलगट तव्यात घ्या.
  2. उकळी आणा, आच कमी करा आणि १५ मिनिटे ठेवा. याने एल्डरबेरीचे उपयुक्त गुणधर्म बाहेर येतात.
  3. बाजूला काढून ठेवा आणि 5 मिनिटे थंड होऊ द्या
  4. आणि मग, बारीकशा गाळणीतून गाळा आणि ग्लास किंवा मगमध्ये ओता.
  5. मधात मिसळा.

More Articles

अधूनमधून उपवास - योग्य प्रकारे करा

वाचा

प्राणायाम - मुलभूत जीवन ऊर्जा आपल्या ताब्यात घ्या

वाचा

योग आणि जिम - तुलना

वाचा

तुमचे शरीर कसे निरोगी ठेवावे

वाचा

खरेदी

ईशा शॉपी

आमच्याबद्दल थोडक्यात

ईशा फाउंडेशनईशा आउटरिच

सहाय्य

Cancellation Policy

सद्गुरू ऍप्प डाऊनलोड करा

© 2022, Isha Foundation, Inc.
सेवा अटी आणि शर्ती. |
गोपनीयता धोरण. | Powered by Fastly